संकट प्रसंगात गरजवंताला मदत करणे हीच आपली संस्कृती : अनिल राठोड
नगर, (दि.0५) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गरजूंसाठी नगर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांच्या मदतीने शिवसेनेने अन्नछत्र सुरु केले. यातून रोज दोन वेळा दोन व्हॅनद्वारे विविध भागातील 1500 हून अधिक लोकांना जेवणाची पाकिटे पोहोच केली जात आहे.
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख दिलीप सातपुते, गिरीश जाधव, मेहुल भंडारी, विशाल वालकर, मनिष गुगळे, विक्रम राठोड, दत्ता जाधव, दत्तात्रय नागापुरे आदींसह शिवसैनिक याची व्यवस्था पाहत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना नेहमीच ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही शिकवण दिली. संकट काळात गरजवंताला मदत करणे हीच आपली संस्कृती आहे. हा मंत्र जपल्यानेच नगर शहरात कोणत्याही अडचणीच्या प्रसंगात लोकांचे डोळे शिवसेनेकडे लागलेले असतात, असे अनिल राठोड यांनी सांगितले.
आताचे कोरोनाचे संकट खूप मोठे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण राज्याला या संकट काळात धीर देऊन प्रभावी उपाययोजना करीत आहेत. सरकारचे प्रमुख म्हणून सर्व परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळतांना त्यांनी शिवसैनिकांनाही सर्व नियम पाळून, सुरक्षेची काळजी घेत लोकांना मदत करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. त्यानुसार नगरमध्ये शिवसेना लॉकडाऊन काळात १०० टक्के समाजकारण करीत गरजूंना मदतीचा हात देत आहे.
कोणत्याही परिस्थितीत कोणावरही उपाशीपोटी राहण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घेत आहेत. १४ एप्रिलपर्यंत अन्नछत्र सुरु राहणार असून त्यापुढेही गरज भासल्यास हा उपक्रम चालूच ठेवणार असल्याचे अनिल राठोड यांनी सांगितले.

Tags:
Ahmednagar