अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त...


। अहिल्यानगर । दि.29 मार्च 2026 । गॅस टंचाईच्या काळात नगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात घरगुती गॅस टाक्यामधून अवैधरित्या व्यवसायिक गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग करणार्‍या आरोपीस 33 हजार 500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.


स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नगर शहरात पेट्रोलिंग करत असताना पथकास साद खान हा त्याचे गुलमोहर रोड, पारिजात चौकाजवळ पत्र्याच्या गोडाऊनमध्ये घरगुती गॅस टाक्यामधून व्यवसायिक गॅस टाक्यामध्ये रिफिलिंग करित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने छापा टाकला असता, एकजण गॅस रिफिलिंग करताना दिसून आला.


शहानवाज शौकत सय्यद (वय 24, रा. दर्गा दायरा जवळ, दगडी चाळ, मुकुंदनगर) असे नाव असल्याचे त्याने सांगितले.11 हजार रूपये किंमतीच्या 10 एच.पी. कंपनीच्या गॅस टाक्या, 20 हजाराच्या दोन इलेक्ट्रीक मोटार मशीन, 2 हजार 500 रूपये किंमतीच्या 5 लाल रंगाच्या गॅस टाक्या असा एकुण 33 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदरच्या गॅस टाक्या कोठुन आणल्या तसेच रिफीलींग कोणाच्या सांगण्यावरुन करत असल्याची विचारपुस केली असता त्याने साद अन्वर खान (रा. घासगल्ली मुकुंदनगर) (पसार) याच्या सांगण्यावरुन करत असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, सोनल भागवत यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

Previous Post Next Post