ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण
महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा गौरव
| नवी दिल्ली | दि.25 जानेवारी 2026 | देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रांतील योगदानसाठी १३१ मान्यवरांना हे पुरस्कार यंदा जाहीर झाले असून, यामध्ये महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राला एक ‘पद्म विभूषण’ तीन पद्म भूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे मानाचे पुरस्कार घोषित केले जातात. २०२६ च्या पुरस्कांरासाठी कला, क्रीडा, विज्ञान, व्यापार आणि समाजसेवा आदी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा समावेश आहे. देशभरातून एकूण १३१ मान्यवरांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून त्यात ५ पद्म विभूषण, १३ पद्म भूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा १९ महिला, ६ परदेशी अथवा अनिवासी भारतीय तसेच १६ व्यक्तींना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला आहे.
