संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षपदी शिंदे


| अहिल्यानगर | श्रीगोंदा 
| दि.18 मार्च २०२५ |  संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी मोहटा सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राजेश्री शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या उच्च शिक्षित असुन सनराईज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, फॅशन डिझायनिंग कॉलेज जबाबदारीने सांभाळत आहेत, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील 15 वर्षाहून अधिक अनुभव आहे.

राजेश्री शिंदे यांना लोकमत उद्योग समूहाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्याबद्दल लोकमत vimens आयडॉल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्याच बरोबर मागील तीन वर्षांपासून श्रीगोंदे येथे शिव जयंती महोत्सव अध्यक्षा, खजिनदार पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे.  त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेऊन त्यांची महिला जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

मला जिल्हाध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिली आहे. ती राजमाता जिजाऊ यांना स्मरून महिला सक्षमीकरण करणे ही जबाबदारी समजून काम करेल, याची ग्वाही देते आणि जिजाऊ रथ यात्रा निमित्ताने ही संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजते.

राजेश्री शिंदे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा


Post a Comment

Previous Post Next Post