। अहिल्यानगर । दि.15 फेब्रुवारी 2025 । सुपा, पारनेर, बेलवंडी व एमआयडीसी दरोडयातील 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश भिंगारदे, हृदय घोडके, भाऊसाहेब काळे, बाळसाहेब खेडकर, अमोल कोतकर, आकाश काळे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दि.25 जानेवारी रोजी रात्री 2 च्या सुमारास फिर्यादी योगेश खंडू शेरकर (वय 30, रा.सोबलेवाडी, पठार वस्ती, ता.पारनेर) यांच्या राहत्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून फिर्यादी व त्यांच्या आईस मारहाण केली. घरातील सोन्याचे दागीने, रोख रक्कम व मोटार सायकल चोरून नेली. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी सिध्देश सादीश काळे (रा. वाळुंज पारगाव,ता.नगर), श्रीहरी हरदास चव्हाण (रा.वडगाव गुप्ता, ता.नगर) यांना अटक केली होती. तर इतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागेश विक्रम भोसले (रा.घोसपुरी, ता.नगर), पवन राजु भोसले (रा.कोपरगाव), देविदास जैनु काळे (रा.बिलोणी, ता.वैजापूर), ऋतीक पैदास चव्हाण (रा.बिलोणी, ता.वैजापूर), उमेश रवी भोसले (रा. नक्ष्शीनगर, कोपरगाव) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली.
ताब्यातील आरोपी नागेश विक्रम भोसले यास विश्वासात घेत अधिक विचारपूस केली असता, त्याने सदरचा गुन्हा पवन राजु भोसले, देविदास जैनु काळे, सिध्देश सादिश काळे, अजय सादिश काळे (पसार), धीरज सादिश काळे (पसार), गणेश सुरेश भोसले, श्रीहरी हरीदास चव्हाण, बाळु झारू भोसले, आवडया सुभाष उर्ङ्ग ठुब्या भोसले, यांच्यासह केला असून
चोरी केलेला मुद्देमाल आपसामध्ये वाटुन घेतला असल्याची माहिती दिली. आरोपींनी सांगितलेल्या माहितीवरून सुपा पोलीस ठाण्यातील दोन, बेलवंडी पोलीस ठाण्यातील एक, एमआयडीसीतील पोलीस ठाण्यातील एक, नारायणगाव पोलीस पाहण्यात एक असे पाच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.