पक्षाचा विचार घराघरांपर्यंत पोहोचवा अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

। शिर्डी । दि.20 जानेवारी 2025 । राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम केले पाहिजे, योग्य नियोजन केले तर येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल.

येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पोर्शभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भाषणाने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. 

या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी देखील पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post