अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नाही : अजित पवार
। मुंबई । दि.24 जानेवारी 2025 । अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? यासंदर्भात राज्यात सध्या चर्चा झडत आहेत. दोन दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार असल्याचे वक्तव्य केले होते.
मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र लाडक्या बहिणींचा पैसा परत घेण्यात कोणताही विचार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी स्पष्ट केले.
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या तेळी ते बोलत होते.
एखाद्या अपात्र लाभार्थ्याला पैसे शासनाला परत करायचे असतील तर नियोजन विभाग ते पैसे जमा करण्यासाठी खिडकी तयार करून देतील. तेथे हे पैसे जमा होतील. आम्ही कोणाचेही पैसे स्वतःहून परत घेणार नाही. ज्या महिला स्वतःहून पैसे परत करतील, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
Tags:
Ahmednagar