। मुंबई । दि.28 जानेवारी 2025 । महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे. एसटी महामंडळ फायद्यात आल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे.
राज्यभरातील विविध जिल्ह्यात उद्धव सेनेने चक्काजमा आंदोलनाचा पुकारा केला आहे. राज्यातील विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असल्याचे चित्र दिसत होते. त्यांनी ही भाडेवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी केली आहे.
भाडेवाढ मागे घेतल्या जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांवर 15 टक्के भाडेवाढ लादून त्यांचा खिसा कापत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला शिवसैनिकांसह ग्रामीण भागातील प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.