। अहिल्यानगर । दि.11 डिसेंबर 2024 । भूतकरवाडी येथील रहिवासी दत्तात्रय दगडू भूतकर (वय 80) यांचे 8 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. दत्तात्रय भुतकर यांची ओळख मामा म्हणून होती.
सावेडी येथे दत्त ऑटोमोबाईल अॅण्ड सर्व्हिसेस चे संस्थापक होते. या मध्यमातून त्यांनी अनेक आयटीआयच्या मुलांना दुचाकी दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले. 1994 सालापासून त्यांनी या व्यवसायात आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक युवकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून स्वतःच्या पायावर उभे केले.
त्यांना समजासेवेची आवड होती. मराठा सेवक संघाच्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. अनेकांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले. समाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी अनेक समाजउपायोगी उपक्रम राबवत समाजातध्ये जनजागृती केली.
अनेक युवकांना त्यांनी मार्गदर्शन करुन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिल्या. अनेकांना त्यांनी व्यवसाय उभे करण्यसाठी मदतीचा हात दिला. युवकांनी व्यवसायाकडे वळण्यासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यांच्या निधनाने अनेकांचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्यावर येथील अमरधान स्मशानभुमीत अत्यंस्कार करण्यात आले. यावेळी समाजिक, उद्योजक, शैक्षणिक, राजकीय मंडळी मोठ्या संख्यने उपस्थित होते. त्याच्या मागे पत्नी, मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक हेमंत भुतकर व विनायक भुतकर यांचे ते वडील होत.
🙏 एका क्लिकवर वाचा साप्ताहिक विजयमार्ग....
