दीड टन प्लास्टिक जप्त, हजारोंचा दंड


 । अहिल्यानगर  संगमनेर । दि.26 डिसेंबर 2024 । संगमनेर नगरपरिषद ऍक्शनमोड वर आली असून प्लास्टिक विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला. संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे व प्लास्टिक विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. प्लास्टिक पिशवी व इतर वस्तूंचा साठा व विक्री करणार्‍या व्यापार्‍यांकडून सुमारे दीड टन (दोन ट्रॉली) प्लास्टिक जप्त करत प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई यावेळी करण्यात आली. 

संगमनेर नगर परिषदेचे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी नगरपरिषदेच्या कारभाराची सूत्रे हाती घेताच शहराची स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचर्‍याचे विलगीकरण तसेच सिंगल युज प्लास्टिक पिशवी व इतर प्लास्टिकच्या बाबत लक्ष केंद्रित केले.

संगमनेर नगर  परिषदेने सिंगल युज प्लास्टिक पिशवी व इतर प्लास्टिकच्या वस्तू यांच्या वापरावर व साठा करण्यावर तसेच विक्रीवर बंदी  घातलेली असताना देखील काही व्यापारी सर्रासपणे प्लास्टिक पिशवीचा साठा व तसेच इतर प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री करतांना निदर्शनास आले. तपासणी करत सुमारे दीड टन प्लास्टिक यामध्ये सिंगल युज प्लास्टिक पिशवी, चमचे, 1/2लास, डिश आदी इतर वस्तूंचा समावेश असलेले प्लास्टिक जप्त केले. प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून दंडाची र क्कम वसूल करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post