नीलम गोर्हे यानी सभागृहात राम शिंदे यांचा परिचर करुन देत सभागृहाचे आणि राम शिंदे यांचे अभिनंदन केले. सभापती निवडीचा प्रस्ताव विधान परिषद सदस्य श्रीकांत शिंदे, उमा खापरे, शिवाजीराव गर्गे यांनी सभागृहात मांडला.
या प्रस्तावाला सदस्या मनीषा कायंदे, अमोल मीटकरी, ज्ञानेेशर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. प्रा.राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसून पदभार सोपविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. अडीच वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदी अखेर भाजपचे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीने उमेदवार दिला नाही. शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची कालच निवड निश्चित झाली होती. गुरुवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची 7 जुलै, 2022 रोजी सदस्यत्वाची मुदत संपुष्टात आल्यापासून सभापतिपद रिक्त होते.
