गजराजनगर फाटा येथुन मोटारसायकल चोरणारा मोटारसायकलसह पकडला

गजराजनगर फाटा येथुन मोटारसायकल चोरणारा मोटारसायकलसह पकडला

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

। अहमदनगर । दि.18 एप्रिल 2024 ।  नगर मनमाड रोडवरील गजराज नगर फाटा येथील शोरूम समोरून मोटरसायकल चोरून नेणारा होता एमआयडीसी पोलिसांनी चोरीच्या मोटरसायकल सह पकडला. त्याच्याकडून चोरीची मोटर सायकल जप्त केली.

या बाबतची माहिती अशी की सागर सुरेश पाटोळे ( रा. जेऊर बायजाबाई ता नगर ) यांची गजराजनगर फाटा येथील टाटा शोरुम येथुन स्प्लेंडर मोटारसायकल (नंबर एम एच 16 बी डी 1861)  हि कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली. या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा द वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्हयाचा तपास करत असताना सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा मधुकर बाबासाहेब ससे (रा.झापवाडी ता. नेवासा ) याने केला आहे. त्यानुसार सपोनि माणिक चौधरी यांनी एमआयडीसी पोलिसांचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे मधुकर बाबासाहेब ससे (वय-४० वर्ष रा. झापवाडी ता. नेवासा ) यास शिताफीने पकडले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तसेच आरोपीकडुन गुन्हयात चोरी गेलेली स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम एच १६ बी डी १८६१) ही जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक, प्रशांत खैरे, पोलीस उप अधीक्षक,संपत भोसले ( नगर ग्रामीण विभाग अहमदनगर)  यांचे मार्गदर्शानाखाली सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोलिस हवालदार नंदकिशोर सांगळे, राजु सुद्रिक, पोलिस नाईक विष्णु भागवत, पोलिस कॉन्स्टेबल किशोर जाधव,नवनाथ दहिफळे, राहुल गुंडु दक्षिण मोबाईल सेल अहमदगनर यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post