मंजुषा काकाणी यांचे मरणोत्तर अवयव दान

। अहमदनगर । दि.16 एप्रिल 2024 । बुरुडगांव रोडवरील ए.के. अपार्टमेंट  येथील रहिवासी सौ.मंजुषा अरविंद काकाणी यांचे रविवार दि. 14 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथील लिलावती हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्या 50 वर्षांच्या होत्या. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर किडणी व लिव्हर या अवयवांचे दान करण्यात आले.

 स्व.मंजुषा काकाणी यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. माहेश्वरी समाजाच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमात त्या उत्साहात सहभागी होत. अ‍ॅड.किसन काकाणी यांच्या त्या स्नुषा तर मुरलीधर सारडा विद्यार्थी भवनाचे संचालक अ‍ॅड.अरविंद काकाणी यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या निधनाने  हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post