पायी फिरणाऱ्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले

। अहमदनगर । दि.18 एप्रिल 2024 । रस्त्याने पायी फिरणाऱ्या 65 वर्षीय महिलेच्या पाठीमागून येऊन कोणतरी अनोळखी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून चोरुन नेले. ही घटना मार्केटयार्ड मागील चैतन्य कॉलनी येथे घडली.

या बाबतची माहिती अशी की उज्वला संपत लाल कटारिया वय 65 राहणार शितल बंगला चैतन्य कॉलनी मार्केट यार्ड मार्गे अहमदनगर या सायंकाळचे वेळी नेहमीप्रमाणे चालण्यासाठी वॉकिंग करण्यासाठी जात असताना एक अनोळखी इसम पाठीमागून त्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे 

वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र उडून नेले यावेळी चौकटारिया या ओरडल्याने निश्चित केल्याने त्यांनी हक्का दिला त्यामुळे ते खाली पडून जखमी झाले व तो इसम मंगळसूत्र घेऊन पसार झाला. त्याने त्याच्या अंगात निळ्या रंगाचा ब्लु टी-शर्ट घातलेला असल्याचे कटारिया यांनी पाहिले.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात उज्वला कटारिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 394 अन्वये गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे या करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post