शिवसेना - संभाजी ब्रिगेडच्या समन्वय समितीची ३० मे रोजी मुंबईत बैठक : डॉ.शिवानंद भानुसे

शिवसेना - संभाजी ब्रिगेडच्या समन्वय  समितीची ३० मे रोजी मुंबईत बैठक

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांची माहिती 


।  मुंबई । दि.29 मे 2023 । शिवसेना - संभाजी ब्रिगेडच्या समन्वय समितीची बैठक ३० मे २०२३ मंगळवार रोजी दुपारी २ वाजता शिवसेना भवन दादर मुंबई येथे होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सध्या आपल्या देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. देश सध्या आर्थिक संकटात असून प्रचंड महागाई व बेकारी वाढली आहे. आरोग्य व शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहे. शेतकरी, शेतमजूर व छोटे उधोजक संकटात आहे. स्वायत्त संस्थाचा गैरवापर सुरू आहे. सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. जातीय व धार्मिक दंगली भडकविण्याचा सातत्याने प्रयत्न आर.एस.एस. व भाजप करीत आहे.

या हुकूमशाहला रोखण्यासाठी आणि लोकशाही, संविधान विचविण्यासाठी व विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेना - संभाजी ब्रिगेडची युती झाली आहे आणि आगामी सर्व निवडणूका शिवसेना - संभाजी ब्रिगेड एकत्रीत लढणार आहे.

या बैठकीत शिवसेना - संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त पदाधिकारी मेळाव्या संदर्भात नियोजनावर चर्चा होणार असून राज्यभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन संदर्भात चर्चा होणार आहे. विविध राजकीय, सामाजिक व इतर विषयावर चर्चा होणार असून येणाऱ्या आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा होणार असल्याचे डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

-----

💥 कृषि केंद्रांवर कृषि विभागाची करडी नजर 

💥 निळवंडे धरणातून ३१ मे रोजी पाणी सोडण्याची चाचणी : महसूलमंत्री

💥 व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन 

Post a Comment

Previous Post Next Post