युपीएससी परीक्षेत महारुद्र भोर उत्तीर्ण

युपीएससी परीक्षेत महारुद्र भोर उत्तीर्ण 

। अहमदनगर । दि.25 मे 2023 ।  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.23) जाहीर झाला असून यामध्ये नगर तालुक्यातील अकोळनेर गावचे रहिवासी व सध्या पवननगर, भिस्तबाग, अहमदनगर येथे वास्तव्यास असलेले महारुद्र जगन्नाथ भोर हे उत्तीर्ण झाले आहेत. महारुद्र भोर यांनी सिंहगड कॉलेज पुणे येथून बी.ई. मेकॅनिकल ची पदवी घेतली आहे. 

त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, सावेडी अहमदनगर येथे झालेले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण आर.वाय.के. कॉलेज, नाशिक येथून पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे ते जेष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच्या निवडीबद्दल द भोर फाउंडेशन अहमदनगर व शिवपार्वती फ्युएल्स श्रीगोंदा यांचे कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा व राज्यभरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post