" चित्रकार योगेश हराळे यांनी जलरंगात काढलेल्या ऐतिहासिक मंदिरे व वाडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन...."

। अहमदनगर । दि.25 मे 2023 । शहाजीराजे भोसले यांनी "स्वराज्या"चा "संकल्प" ज्या नगरा मध्ये केला त्या अहमदनगर शहराचा ५३३ वा वर्धापन दिन तसेच योगेश हराळे आर्ट स्टुडिओ गॅलरीचा पहिला वर्धापन दिन निमित्ताने शहरातील ऐतिहासिक मंदिरे व वाडे यांच्या जलरंगातील चित्रांचे प्रदर्शन दि.२७,२८,२९ मे २०२३ रोजी आयोजित केले आहे.

"शहाजीराजे भोसले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या" पावन स्पर्शाने पवित्र झालेले व "मालोजीराजे भोसले" यांनी बांधलेले "अमृतेश्वर मंदिर", भिंगारचे शुक्लेश्वर मंदिर, शहरातील अष्टविनायक गणपती मंदिरे, भातोडी चे नृसिंह मंदिर, आंनंदधाम, सावेडी चे दत्त मंदिर,श्री अयप्पा मंदिर तसेच ५०० वर्षा पूर्वी चा कुकडे वाडा, पटवर्धन वाडा,सरदार मिरिकरांचा वाडा इत्यादी जलरंगातील चित्रे  आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रकार योगेश हराळे यांनी रेखाटली आहेत.

या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.२७ मे २०२३ रोजी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले,  न्यू इंग्लिश स्कूल, वाकोडी च्या  अध्यक्षा श्रीमती शकुंतलाताई शरदराव तोडमल ,  नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. स्थळ- योगेश हराळे आर्ट स्टुडिओ गॅलरी  पावन गणपती मंदिराच्या जवळ,सारसनगर, वेळ - सकाळी ९:०० ते रात्री १०:०० वाजे पर्यंत. संपर्क- 8208357384

-----

֏ अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार : विखे पाटील 

֏ ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये : मुख्यमंत्री

֏  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ 

Post a Comment

Previous Post Next Post