गुरुवारी जाहीर होणार 12 वीचा निकाल

। पुणे ।  दि.24 मे 2023 । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा फेब्रुवारी - मार्च 2023 चा निकाल गुरुवार (दि.25) रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागातील मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षाच निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी दि.25 मे 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

1. mahresults.nic.in
2.https://hsc.mahresults.org.in
3.http://hscresult.makcl.org
4.https://hindi.news18.com/news/career/bord-results-maharathra-board
5.https://www.indiatoday.in/education-today/maharastra-board-class-12th-result-2023
6.http://mh12.abpmajha.com

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावंरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.

mahresults.nic.in  या संकेस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर संख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

तसेचwww.mahahsscboard.inया संकेस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Post a Comment

Previous Post Next Post