। अहमदनगर । दि.10 फेब्रुवारी । घरासमोर लावलेल्या कारच्या पाठीमागील बाजूची काच अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा फोडून कारमध्ये ठेवलेली रोख रक्कम, 1 एच.पी. कंपनीचा लॅपटॉप व 1 लिनोवा कंपनीचा टॅब चोरुन नेल्याची घटना नगर तालुक्यातील शेंडी गावात बुधवारी (दि.8) दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास घडली.
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निषाणा तर शरद पवारांचे कौतुक !
याबाबत अशोक गणपतराव कराळे (वय 59, रा.शेंडी, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कराळे यांच्याकडे इंडिका व्हिस्टा कंपनीची कार असून सदरची कार (एम.एच.20, सी.एच.6076) त्यांनी बुधवारी (दि.8) दुपारी त्यांच्या घरासमोर उभी केलेली होती.
"महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार जनता विरोधी, कुचकामी व षडयंत्रकारी " : अँड मनोज आखरे
फिर्यादी कराळे हे घरात असताना अज्ञात चोरट्याने कारच्या पाठीमागील बाजूची काच फोडून कारमध्ये ठेवलेली रोख रक्कम, 1 लॅपटॉप व 1 टॅब असा सुमारे 85 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर कराळे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार : उपमुख्यमंत्री
