जिल्हा परिषदेतील आरोग्य शिबिराला प्रतिसाद

। अहमदनगर । दि.10 ऑगस्ट । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेली आहे. हे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. दोन दिवसांपूर्वीच महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व पारंपारिक खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

आज (सोमवारी) जिल्हा परिषदेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या शिबिरात एकूण १४८ जणांची तपासणी करण्यात आली. 

यामध्ये ७६ पुरुष व ७२ महिलांचा समावेश आहे. कोरोनाचा बुस्टर डोसही या वेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषदेतील एकूण ७६ जणांनी बुस्टरचा डोस घेतला. यामध्ये ४० पुरुष व ३६ महिलांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post