डी. आय. गायकवाड यांचा सेवानिवृत्तीबद्ल नागरी सत्कार

। मुरूम । दि.07 मार्च । सहसंचालक, साखर आयुक्तालय, पुणे येथून सेवानिवृत्ती झालेले डी. आय. गायकवाड यांचा नागरी सत्कार समारंभ मुरुम येथील रत्नमाला मंगल कार्यालयात रविवारी (ता.६) रोजी आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, जेष्ठ विचारवंत माजी प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, अतिरिक्त सहकार आयुक्त एम. आर. मोरे, माजी उपविभागीय कृषी अधिकारी मोहन भिसे, हैद्राबादचे प्रभुदयाल मिश्रा, उपजिल्हाधिकारी अविनाश कांबळे, मुंबईचे एसीपी राजेंद्र पाटील, सहसंचालक साखर आयुक्तालय राजेश सुरवसे, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सिध्दार्थ भालेराव

माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, भाजपचे नेते श्रीकांत मिनियार, जिल्हा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन कैलास शिंदे, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, लातूरचे माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकण्णा, प्रशांत मुदकण्णा, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, विठ्ठल पाटील, प्रा. डॉ. महेश मोटे, महेश निंबरगे, प्रा. डॉ. शौकत पटेल, विठ्ठलसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, अशोक मिनियार, डॉ. नितीन डागा आदींच्या प्रमुख उपस्थिती सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार स्फूर्ती गायकवाड यांनी मानले. यावेळी शरण पाटील, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. श्रीकांत गायकवाड, प्रा. किरण सगर, डॉ. सिध्दार्थ भालेराव, मोहन माने, दिलीप भालेराव, डॉ. शौकत पटेल, राजेश सुरवसे आदींनी डी. आय. गायकवाड यांच्या प्रती  मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आनंद कांबळे, अमोल बनसोडे, प्रणित गायकवाड, आदित्य बनसोडे, हर्षवर्धन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post