सोन्या-चांदीच्या दरात घसरण !

जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने मंगळवारी भारतीय बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली. आज मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 325 रुपयांनी घसरला आहे.गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव 3,500 रुपयांनी घसरला आहे.

 रशिया युक्रेन युद्ध मागच्या तीन आठवड्यांपासून सुरुच आहे. या युद्धाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारपेठेतील उत्पादनाचे शुल्क वाढले आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आजचे सोन्याचे दर हे कालच्या तुलनेत किंचित कमी झाले आहेत. 

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते?
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post