केडगावजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

। अहमदनगर । दि.02 सप्टेंबर । भरधाव वेगातील पिकअप टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन समोरून येणार्‍या मोटरसायकलवर धडकला. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना केडगाव सोनेवाडी रोड वरील एमएसईबी पॉवर हाऊस जवळ, लोंढे मळा येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की केडगाव-सोनेवाडी रोडवर भरधाव वेगात जाणार्‍या पिकअप व्हॅन टेम्पो (क्रमांक जीजी-8459) वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला गेला. व समोरून येणार्‍या मोटारसायकलवर जोरात धडकला. 

या धडकेत मोटारसायकलस्वार बालाजी कुंडलिक हुंगले (वय 29, राहणार सोनेवाडी, नगर) गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघात होताच टेम्पो चालक घटनास्थळावरून प्रसार झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गंगाराम पुंडलिक साने (वय 27, अकोळनेर, तालुका नगर) यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार गाजरे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post