। अहमदनगर । दि.07 सप्टेंबर । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांचेतर्फे जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील उमेदवारांसाठी प्रधान मंत्री कौशल्य विकास 3.0( पीएमकेव्हिवाय 3.0 स्ट्रिव) प्रकल्पांतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सदर योजनेसाठी सोलार पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन, सीएनसी प्रोग्रामर, ऑटोमोटिव सर्विस टेक्निशियन (टू अँड थ्री व्हीलर) आणि रेफ्रिजरेशन इक्विपमेंट मेंटेनन्स स्पेशलिस्ट कोर्सेसचे प्रशिक्षण देण्याचे नियोजीत आहे. यासाठी किमान 10 वी., आय टीआय, डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी निशुल्क प्रशिक्षण देण्याचा प्रस्तावित आहे.
सदर अभ्यासक्रम प्रवेश घेणा-या इच्छुक उमेदवारांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक आधाराशी लिंक असलेला आधार कार्ड, फोटो व अभ्यासक्रमाचे नाव इ. बाबतची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर येथे माहिती समान्वयक जी. बी. हडतगुणे यांचेकडे दिनांक 9 सप्टेंबर 2021 पर्यंत जमा करावी. तसेच अधिक माहितीसाठी 0241-2328013 या दूध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
Tags:
Ahmednagar
