लेखी आश्वासना नंतर रास्ता रोको आंदोलन मागे
नगरसेवक सचिन शिंदे यांच्या आंदोलनानंतर रस्त्याच्या कामास होणार सुरुवात
। अहमदनगर । दि.17 सप्टेंबर । शिवाजी नगर नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर पर्यंत हा रस्ता पावसाळ्यात अत्यंत खराब झालेला, वाहतुकीसाठी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर परिसरातील नागरिक त्रस्त झाली आहे. वारंवार निवेदन देऊन त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करतात. वर्षानुवर्षांपासून हा रस्ता खराब अवस्थेत आहे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना नगरसेवक सचिन शिंदे यांनी रस्ता रोको आंदोलन केले
राष्ट्रीय महामार्ग खडबडून जागे झाले लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, संजय शेंडगे, नगरसेवक शामभाऊ नळकांडे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, शिक्षकसेना शहर जिल्हाध्यक्ष पारुनाथ ढोकळे सर, दिनकर आघाव, सतिश गिते, जयप्रकाश डिडवानिया, हिरामण गुंड, बापू कांडेकर आदीसह नागरिक आदी सहभागी झाले होते.
लवकरात-लवकर रस्त्याचे पॅचिंग व सिंगल हात कार्पोरेटचे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने दि.17 सप्टेंबर रोजी कल्याण रोड सिना नदी पुल येथे तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको करण्यात आले.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले.
कल्याण-अहमदनगर-पाथर्डी-नांदेड रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 वरील अहमदनगर बायपास ते सक्कर चौक व स्टेट बँक चौक ते मेहेकरी या 18.50 किमी लांबीमध्ये डांबरी मजबुतीकरणाचे काम व उड्डाणपुल ते सीना नदी पर्यंत दोन्ही बाजूस काँक्रीट गटर बांधण्याचे काम मंजुर आहे. रस्त्याच्या उड्डाणपुल ते नेप्ती नाका ते अमरधाम या लांबीमध्ये पावसाळा असल्यामुळे खड्डे भरणेचे काम यापूर्वी (खडी) मटेरिअलने करण्यात आले होते.
तसेच काही भागात डांबरीकरणानेही खड्डे भरणेचे काम करण्यात आले होते परंतु मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुन्हा नव्याने खड्डे पडलेले आहेत. सद्यस्थितीत पाऊस थोडा थांबला असलेने वरील लांबीमध्ये त्वरित डांबरीकरणाने खड्डे भरणेबाबत कंत्राटदारास सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने कंत्राटदाराकडुन डांबरीकरणाने खड्डे भरेणेबाबत काम सुरु करण्यात येत आहे.
तसेच या भागातील डांबरीकरणाचे काम निविदेनुसार पुर्ण करून लवकरच रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करणेत येईल याबरोबरच काँक्रीट गटारचे कामही त्वरीत सुरु करणेचे नियोजन केले आहे. कार्यालयाकडून कंत्राटदाराकडे कामाकरिता नियमित पाठपुरावा करण्यात येत असू लवकरच रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यात येईल. नियोजित रस्ता रोको आंदोलन मागे घ्यावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे त्यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
Tags:
Ahmednagar
