नेप्तीत कांद्याची आवक ; एक नंबर कांद्याला किती मिळाला भाव...वाचा सविस्तर

। अहमदनगर । दि.11 सप्टेंबर । येथील दादापाटील शेळके पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये आज (शनिवारी) कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर कांद्याला जवळपास 1800 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. नेहमीच्या तुलनेत आज बाजार समितीत मात्र कांद्याची आवक वाढले होती.

नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या 57 हजार 200 गोण्यांची आवक झाली. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा परिणाम काही अंशी भाववर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजार भाव कमी झालेले असून त्यात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक चिंतातूर झालेले आहे.  

बाहेरील राज्यातून कांदा खरेदीसाठी येणार्‍या व्यापार्‍यांची संख्या कमी झालेली आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर होत आहे. बाहेरील राज्यातून मागणी वाढल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल, असे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमधून होत आहे. कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1450 ते 1800, दोन नंबर ः 900 ते 1450, तीन नंबर ः 250 ते 550.

शेतकर्‍यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून व निवडून विक्रीस आणावा,. असे आवाहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालकांतर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post