। अहमदनगर । दि.06 सप्टेंबर । केडगाव येथील एकाच कुटुंबातील 3 जण मृतावस्थेत आढळून आले आहेत. आई वडीलांनी दहा वर्षाच्या मुलीला गळफास देवून नंतर स्वत:ही गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यात आईवडीलांसह चार वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या ठिकाणी एक चिट्ठी सुद्धा आढळून आलेली आहे. केडगाव अथर्व नगर मध्ये फाटक कुटुंब राहत. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्या केलेल्या मध्ये संदीप दिनकर फाटक (वय 40) किरण संदीप फाटक (वय 32) मैथिली संदीप फाटक (वय 10) अशी त्यांची नावे आहेत.
सदरची घटना आज आजूबाजूच्या लोकांना कळाली त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला.