महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अंबिकानगरच्या वतीने भव्य खड्डे फोटो स्पर्धा

। अहमदनगर । दि.13 सप्टेंबर । मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने नगर मध्ये बेस्ट खड्डा स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनीधींची होत असली डोळेझाक लक्षात घेता याचा जाहीर निषेध करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी दिली आहे.

विद्रूप, खोल, जिवघेणा, आकर्षित अशा खड्यांच्या फोटोला योग्य असे बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ अंबिकानगर महानगरपालिका येथे आयोजित करण्यात येणार आहे आणि सन्माननीय, वंदनीय, पुजनीय, कार्यसम्राट, कर्तुत्ववान आयुक्त यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील असे ही त्यांनी म्हंटले आहे.

तरी सर्व नगरकरांनी आपापल्या भागातील चौकातील गल्लीतील सुदंर अशा वेदनादायक जीवघेण्या अशा लोकप्रतिनिधींना आवडणार्‍या खड्यंचे जास्तीत जास्त फोटो काढून या 96574-57661 क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन वर्मा यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post