दीड लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, पाचजणां विरोधात गुन्हा दाखल

। अहमदनगर । दि.10 सप्टेंबर ।  माहेरहून दीड लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ केल्याबद्दल पती व सासू-सासरे यांच्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पतीला मोटार सायकल खरेदी करण्यासाठी व घराची उधारी देण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये आणावेत, 

या मागणीसाठी विवाहितेचा सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना नगर-मनमाड रोडवरील बोल्हेगाव येथील संत तुकाराम नगर येथे दि. 14 डिसेंबर 2016 ते 6 सप्टेंबर 2021 दरम्यान विवाहितेच्या सासरच्या घरी घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय पीडित विवाहिता महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती प्रशांत दंडवते, सासरा दत्तात्रय रघुनाथ दंडवते, सासू अलका दत्तात्रय दंडवते, पतीचा मामा लक्ष्मण भागवत जाधव, आत्या शोभा संभाजी थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विवाहितेने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दमदाटी करण्यात आली. तिला उपाशीपोटी ठेवून मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post