एटीएम मशीन चोर निघाला बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा मास्टरमाईंड

एटीएम मशीन चोर निघाला बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा मास्टरमाईंड

अरोपीच्या घरातून बनावट नोटा छापण्याची सामग्री केली जप्त

आरोपी पोलिसांच्या ताब्यात झटपट श्रीमंत होण्यासाठी निवडला मार्ग 


। अहमदनगर । दि.04 सप्टेंबर ।टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर येथे 26 ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजता चे सुमारास टाकळी ढोकेश्वर गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल पारनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा तपास पारनेर पोलिसांनी 24 तासात लावून तीन चोरट्यांना अटक केली मात्र या आरोपी मधील एक आरोपी चक्क बनावट चलनी नोटा छापत असल्याची माहीती मिळाल्याने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे .

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की 26 ऑगस्ट रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया टाकळी ढोकेश्वर जवळील एटीएम मशीन चोरट्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने तपास केला असता पोलिसांनी या टोळीचा छडा लावण्याचे काम केले त्यामध्ये आरोपी विकास सुरेश रोकडे वर्ष 19 राहणार वडगाव सावताळ तालुका पारनेर याच्यासह .दोन आरोपींना अटक केली तपास करत असतानाच आरोपी सुरेश रोकडे हा बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळत गेली.

परंतु तो कोठे नोटा छापतो याबाबत स्पष्ट माहिती मिळत नव्हती गुन्ह्याचा तपास करत असतानाच तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले यांनी आरोपीच्या वडगाव सावताळ तालुका पारनेर येथील घराची घर झडती घेतली असता त्याच्या घरात पाचशे व शंभर रुपये दराच्या छापलेल्या बनावट चलनी नोटा व नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे रंग कागद इत्यादी सामग्री मिळून आल्याने पोलिसांनी जप्त केली असून आरोपीच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशन नंबर 629 /2019 भारतीय दंड विधान कलम 489 ( अ ) 489 ( ड ) 489 ( इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडे छापण्यात आलेल्या नोटांचा वापर कोठे केला आहे.

याबाबत विचारपूस करून त्यास मदत करणारी त्याचे साथीदार आरोपींची माहिती व बनावट नोटांचे मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे वरील कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम घनश्याम बळप पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस अंमलदार भालचंद्र दिवटे सुधीर खाडे सुरज कदम सत्यजित शिंदे श्रीनाथ गवळी सचिन लोळगे पोलीस मित्र अभिजीत जाधव यांनी उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत .

पोलिसांनी केलेले आवाहन ...
पारनेर पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे  की यातील आरोपी ने कोणास बनावट चलनी नोटांच्या साह्याने फसवणूक केलेली असेल अथवा बनावट चलनी नोटा चे संदर्भात काही केला असेल तर त्यांनी पारनेर पोलीस स्टेशनची संपर्क करावा 

Post a Comment

Previous Post Next Post