। अहमदनगर । दि.30 ऑगस्ट । विसापूर शिवारात झारखंड येथील सुरजकुमार कारू साव ( २४ वर्षे हल्ली मुक्काम पारगाव सुद्रिक) या युवकास स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून शुक्रवारी सायंकाळी १ लाख २० हजार रुपयांना गंडवले. बेलवंडी पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २ तासात या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडून १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सुरजकुमार याला शुक्रवारी राजू नामक व्यक्तीने फोन करून तुला स्वस्तात सोने देतो असे सांगत विसापूर रेल्वे पुलाजवळ बोलावले. त्याच्याकडून सोने नेण्यासाठी आणलेली रक्कम आणि इतर मुद्देमाल असा १ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एक महिला व त्याच्या इतर १५ ते २० साथीदारांनी दगडाने व काठीने मारहाण करून पळवून नेला.
सुरजकुमारने बेलवंडी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शभ्या कुंज्या चव्हाण (२८, सुरेगाव), जितेंद्र रॉकेट चव्हाण (२५, पढेगाव), बाबुश्या चिगळया काळे (१८, वागदरी), घडयाळया हिरामण चव्हाण (५० सुरेगाव), रेबीन घडयाळया चव्हाण (४५, सुरेगाव), ओंकार कुज्या चव्हाण (१९, सुरेगाव) व एक अल्पवयीन अशा सात जणांना दोन तासांत ताब्यात घेतले.
