। अहमदनगर । दि.21 मे । टाळेबंदीत उदरनिर्वाहासाठी विडी कामगारांना दोन हजार रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी लालबावटा विडी कामगार युनियनच्या (आयटक) वतीने श्रमिकनगर येथे विडी कामगारांनी घरा बाहेर येऊन निदर्शने केली.
रेशनवर मिळणारे गहू, तांदूळ व डाळवर कुटुंब चालत नसून, इतर गरजा भागविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अनुदान देण्याची मागणी विडी कामगारांनी यावेळी केली. अन्यथा श्रमिक बालाजी मंदिराच्या आवारात आमरण उपोषण करण्याचा इशारा कामगारांनी दिला.
तसेच विडी कामगारांच्या मदतीसाठी धावून आलेल्या साबळे वाघीरे या कंपनीने सर्व कामगारांना एक हजार रुपये आगाऊ र क्कम दिल्याने संघटना व विडी कामगारांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी जिल्हा सचिव अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, शोभा पासकंठी, शारदा आडेप, रेणुका अंकारम, संगिता कोंडा, भाग्यलक्ष्मी, गड्डम, निर्मला न्यालपेल्ली, सुनिला बिटला, रेणुका दिकोंडा, वन्ना कल्याणम आदिंसह परिसरातील विडी कामगार महिला उपस्थित होत्या.