हिंडफिर्‍यांना आवरण्यासाठी दिल्लीगेट परिसरात धडक कारवाई

। अहमदनगर । दि.18 मे । कोरोना महामारी काबूत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन कडक पाऊले उचलत असली तरी काही हिंडफिर्‍यांना आवरण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे रस्त्यावर उरतले ! 



दिल्लीगेट परिसरात हिंडफिर्‍यांवर दंडुका उगारत कडक कारवाईही केली. त्यामुळे बराचवेळ या भागात हिंडफिरणारे चमकलेच नाहीत. त्यामुळे साहेबांना दररोज शहरात फेरफटका मारून हिंडफिर्‍यांना आवरावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



महापालिका आयुक्तांनी किराणा, भाजीविक्रेत्यांवरही बंदी घातली असली, तरी मोकाट फिरणार्‍यांची संख्या कमी होताना दिसत नाही. चौकाचौकात आता अँटीजन होत असल्याने काही प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे गत दोन दिवसांत हिंडफिरणार्‍यांची संख्या रोडावली आहे.

 

आज मंगळवारी सकाळी दिल्लीगेट येथे अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी स्वतः थाबून वाहनांची तपासणी करून कारवाई केली, तर चितळे रोडवर विनाकारण फिरणारे याची अँटिजेल तपासणी करण्यात येत होती.

Post a Comment

Previous Post Next Post