। अहमदनगर । दि.18 मे । माहेरून पन्नास हजार रुपये आणण्याची मागणी करून पैसे न आणल्याचा राग मनात धरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण केली. आणि गळा दाबून तिचा खून केला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजे गावात घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की सीमा रासकर काळे ( राहणार धनगरवाडी खांडगाव श्रीगोंदा ) हिचे राहुल संजय भोसले ( राहणार घारगाव तालुका श्रीगोंदा ) याच्याशी लग्न झाले. लग्नानंतर सीमा हि तीच्या सासरी नांदत असताना तिचा पती राहुल व सासरा संजय उरूस भोसले ( दोघे राहणार घारगाव )
यांनी सीमाच्या लग्नात झालेला खर्च रुपये पन्नास हजार हा तुझ्या वडिलांकडून घेऊन ये अशी सीमाला सांगितले. परंतु वडिलांची आर्थिक परिस्थिती नसल्याने तिने पैसे आणले नाही, याचा राग मनात धरून सीमाचा पती व सासरा यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला तोंडावर, हातापायावर, पाठीवर मुक्का मार देऊन मारहाण केली. आणि हाताने तिचा गळा दाबून खून केला.
याप्रकरणी पोलिसांनी प्रथम सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली तपासाअंती सीमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाल. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी रासकर अंकुश काळे ( वय 45 राहणार धनगरवाडी, खामगाव, श्रीगोंदा ) यांच्या फिर्यादीवरून खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे हे करीत आहेत.
