क्षेत्राकडे वळावे : स्वप्निल खराडे
। अहमदनगर । दि.12 एप्रिल । शालेय शिक्षणाबरोबरच आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. संगीत क्षेत्रामध्ये आजचा विद्यार्थी आपले करिअर करु शकतो व कलेच्या माध्यमातून देशपातळीवर आपली ओळख निर्माण करु शकतो. आपल्या महाराष्ट्र राज्याला कला क्षेत्राची मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्राकडे वळावे, असे प्रतिपादन आरोही संगीत विद्यालयाचे संस्थापक स्वप्निल खराडे यांनी केले.
नवनागापूर येथील आरोही संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या वतीने जानेवारी २0२१ मध्ये घेण्यात आलेल्या तबला व गायन या परीक्षांमध्ये आरोही संगीत विद्यालयातील विद्यार्थी हे विशेष योग्यता श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
आरोही संगीत विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी :- प्रारंभिक परीक्षा (तबला) - संदीप संजय मांढरे - विशेष योग्यता, प्रदीप संजय मांढरे - विशेष योग्यता, समर्थ लक्ष्मण दांगट- विशेष योग्यता, प्रेरणा किर्तीवुमार गुडगळ- विशेष योग्यता, केतन संजय शिंदे-प्रथम श्रेणी, हेमंत विजय मांढरे-प्रथम श्रेणी तसेच प्रवेशिका प्रथम (गायन) - स्वप्नाली वसंत साळोखे-विशेष योग्यता, शितल सुखदेव दळवी - प्रथम श्रेणी या विद्यार्थ्यांना आरोही संगीत विद्यालयाचे संस्थापक स्वप्निल खराडे तसेच आशुतोष खराडे व रावसाहेब खराडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
