चास येथे रॅपिड तपासणी

। अहमदनगर । दि.13 एप्रिल ।चास ( ता. नगर ) प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आठ नागरिंकाची रॅपिड टेस्ट तपासणी करण्यात आली.एक रुग्ण पॉजीटिव्ह निघाला.

 

यावेळी पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार, सरपंच राजेंद्र गावखरे , उपसरपंच युवराज कार्ले उपस्थित होते .पवार यानी  रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. 

 

तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी माहिती करून संबंधितांना तशा सुधारणा करण्यासाठी सूचित केले.  आरोग्य कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणी संबंधी चर्चा केली.  सुट्टीचा दिवस असूनही ह्या ठिकाणी रुग्णांची रॅपिड टेस्ट करून घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post