दोन ट्रकची सामोरासमोर धडक

। अहमदनगर । दि.12 एप्रिल ।  वाकी कडून हैदराबाद कडे जाणाऱ्या ट्रकची भरधाव वेगात समोरून येणाऱ्या ट्रकने  समोरासमोर धडक दिली. या धडकेत ट्रक चालक जखमी झाला. ही घटना सोलापूर रोडवरील डाकू निमगाव शिवारात घडली.


 याबाबतचे अधिक माहिती अशी की मोहम्मद हरून मनीअर ( राहणार साहिल आपारमेंट कोपर्डी रोड बलसाड गुजरात ) हे ट्रक ( क्र. डी जे 15 ए ई 8997 ) घेऊन हैदराबाद कडे जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या  मालट्रक ( क्र. टी एन 42 टी 8926 ) ने समोरून धडक दिली. 

 

या धडकेत मोहम्मद आसिफ शेख ( वय.36 रा. वलसाड गुजरात ) हे जखमी झाले. या अपघातात दोन्ही ट्रकचे नुकसान झाले. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार पाचपुते हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post