लांडेवाडी शिवारात चोरट्यांनी मारला सोन्याच्या ऐवजावर डल्ला

। अहमदनगर । दि.19 एप्रिल । घराच्या दरवाजाला आतून लावलेली कडी कोणीतरी अज्ञात चोराने आतमध्ये हात घालून कडी उघडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून डब्यातील 37 हजार रुपये रोख,व  दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून गेले. ही घटना नेवासा तालुक्यातील लांडेवाडी शिवारातील घावटे वस्ती येथे घडली.



याबाबतची अधिक माहिती अशी की शिवाजी सोन्याबापु घावटे ( वय 50 राहणार धावटे वस्ती लांडेवाडी शिवार नेवासा ) हे त्यांच्या घरी कुटुंबासह झोपलेले असताना कुणीतरी अज्ञात चोराने पहाटेच्या सुमारास घराला आतून लावलेली कडी बाहेरून हात घालून उघडून आत प्रवेश केला. आतील  सामनाची उचकापाचक केली. व डब्यातील 37 हजार रुपये रोख, व दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.



याप्रकरणी सोनई पोलिसांनी शिवाजी धावडे यांच्या फिर्यादीवरून भा द वि कलम 457 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक थोरात हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post