। अहमदनगर । दि.13 एप्रिल । रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असताना, रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मतीन सय्यद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली.
यावेळी कैलास सोनवणे, नईम शेख, मोईज शेख, नाजीम सय्यद, आसिफ शेख आदी उपस्थित होते. भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटल येथे पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईचे स्वागत आहे. कोरोना महामारीत हा गोरख धंदा सुरु आहे. हे संघटित गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची गरज आहे.