सोन्या – चांदीच्या दरात पुन्हा घसरण

। मुंबई  । दि.24 मार्च । गेल्या काही महिन्यांत सोन्या – चांदीच्या किंमतीत कमालीचा चढ – उतार होताना दिसत आहे. अलीकडे या दरात घट झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कालच्या प्रमाणे  मंगळवारी सुद्धा तर सोन्या- चांदीच्या दरात घसरण झाली. 

 

कमी पाहायला मिळतोय.आज सोन्याच्या भावात प्रति तोळा 130 रुपये आणि चांदीच्या दरात प्रति किलो मागे 900 रुपयांनी घट झाली होती. काल 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत काल 43,930 रुपये होती. आज ही किंमत कमी होऊन 43, 800 इतकी झाली होती.

 

तसेच काल 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची कालची किंमत 44,920 रुपये इतकी होती. आज यामध्ये 120 रुपयांनी घट झाली. आज हा दर 44, 800 वर येऊन पोहोचला होता.तर चांदीचा दर काल एक किलोला 67,500 इतका दर होता. तर तोच भाव 66,600 रुपये इतका होता.

Post a Comment

Previous Post Next Post