। अहमदनगर । दि.27 मार्च । नगर-मनमाड रस्त्यावरील नांदगाव येथील ओम भगवती कला केंद्रावर राडा केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नितीन भाऊसाहेब कदम, भाऊराव शिवाजी उगले, (दोघे रा. धामोरी, ता. राहुरी) आणि ऋषिकेश प्रभाकर घोडके, (रा. धुमेगाव, ता. गेरवराई) असे कारवाई करण्यात आलेल्या तिघांनी नावे आहेत.
पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कला केंद्रावर धिंगाना घालून तोडफोड केली. तसेच तलवारीचा धाक दाखवून 12 हजार 250 रुपयांची रोकड लांबविली.
याप्रकरणी सतीश महेश काळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे करीत आहेत.
या गुन्ह्यात आणखी तीन आरोपी असून ते फरार आहेत. त्यांच्या पोलिस शोध घेत आहेत.
