आनंदऋषिजी महाराजांचा स्मृतिदिन चिचोंडीत साजरा

। करंजी । दि.29 मार्च । राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचा २९ वा स्मृतिदिन रविवारी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या चिचोंडी शिराळ येथील धर्म स्थानकांमध्ये संस्थेचे कार्यकारी सदस्य विश्वजीत गुगळे, प्रमोद गुगळे, राजेंद्र मुनोत, हिरालाल गुगळे यांच्या उपस्थितीत पार पडला. 

 

यावेळी प्राचार्य ओस्तवाल यांनी आनंद गान या प्रार्थनेचे गायन केले. प्रा. गरड यांनी आनंद बाबांच्या जीवनावर जन्मापासून तर समाधी मरणा पर्यंतचा सर्व जीवनपट उलगडून दाखवला. 

 

गादीया यांनी त्यांच्या जीवन पैलूवर प्रकाश टाकत विविध गीतांचे स्मरण करून दिले. खंडागळे व राजगुरू यांनी आनंद बाबांच्या जीवनावर एक सुंदर गीत गायले. आभार सेवा निवृत्त शिक्षक देखणे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post