। अहमदनगर । दि.24 मार्च । भरधाव वेगातील ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन समोरून येणार्या सहा चाकी अल्ट्रा वाहनावर धडकला.
या अपघातात एक जण जखमी झाला. ही घटना सोमवारी ( दि. 15) पहाटेच्या सुमारास नगर पुणे रोड वरील मनपा कार्यालय शेजारील पावन गणपती मंदिरासमोर घडली.
अनिल तुमच्या पुंजा धामोले ( वय 40 रा. उचंदागाव, मुक्ताईनगर, जळगाव ) हे त्यांच्या सहा चाकी अल्ट्रा वाहनातून ( क्र. एम एच 12 क्यू डब्ल्यू 5633 ) पुण्याहून जळगाव कडे जात असताना गणपती मंदिरासमोर समोरून वेगात आलेल्या ट्रकने रस्त्याच्या उजव्या बाजूस येवून धडक दिली.
या धडकेत अनिल पूंजा धामोळे हे जखमी झाले. अपघात होताच ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस नाईक गर्जे करीत आहेत
