। अहमदनगर । दि.25 मार्च । माणिकचौक येथील जुन्या पिढीतील सुबोध टायपिंग क्लासेसचे संचालक दामोदर विनायक धर्माधिकारी यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
मृत्यू समयी ते 73 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
स्व.धर्माधिकारी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सूना,जावई, नातवंडे असा परिवार आहे. माणिकचौक येथील एकमुखी दत्त मंदिराचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले. टायपिंग क्लासच्या माध्यमातूनत्यांनी अनेक विद्यार्थी घडविले.
त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांना नोकरी मिळाली. ते मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.