शहरात आणखी 3 मायक्रो कन्टेन्मेंट झोन; एकूण झोन 22

। अहमदनगर  । दि.22 मार्च । अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, शहरात आणखी 3 ठिकाणी मायक्रो कन्टेन्मेंट झोन जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे एकूण कन्टेन्मेंट झोनची संख्या 22 वर पोहोचली आहे.

 

शहरात ऍक्टिव्ह रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने यापूर्वी शहरात 19 ठिकाणी मायक्रो कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेले असून, रविवारी ज्या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले अशा 

 

सावेडी परिसरातील प्रसाद चेंबर्स, बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा परिसर व सिद्धार्थनगर या ठिकाणी मायक्रो कन्टेन्मेंट झोन जाहीर करून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post