| अहिल्यानगर | दि.26 मार्च 2026 | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशन, नाशिक येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांचा तपास पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. पीडित महिलांचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात आल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव येथे बीएमडब्ल्यू या व्हॉटसऍप गु्रपवर दि. 25 मार्च 2026 रोजी राहुल गंगाधर शिंदे (अनिल कोल्ड्रिंग्ज कोपरगाव) याने मोबाईलवरून पीडीत महिलांचे अश्लिल व्हिडीओ प्रसारीत केले. त्यावरून पोलिसांनी तपास केला असता, सदरचे व्हिडीओ राहुल शिंदे यास योगेश पंढरीनाथ आढाव (रा. कोपरगाव) याने पाठविले असून योगेश आढाव यास ते व्हिडीओ त्याचा मित्र संदीप गर्जे (रा. माजलगाव, जि. बीड) याने पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.
त्यावरून राहुल गंगाधर शिंदे, योगेश पंढरीनाथ आढाव, संदीप गर्जे या तिघांविरूध्द कोपरगाव शहर पोलिस ठाणे येथे बीएनएस कलम 294 (2), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शिंदे व योगेश आढाव यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संदीप गर्जे याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Tags:
Ahmednagar
