प्रकृती बिघडल्याने मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल


। मुंबई । दि.24 एप्रिल 2024 । संघर्षयोध्दे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना  छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

👉 सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कडाका  प्रचंड वाढला आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांमुळे राजकारण तापत आहे. विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भर उन्हात प्रचारसभा होत आहे.
भर उन्हात रॅली निघत आहे. तर दुसरीकडे उन्हाचा कडाकादेखील तितकाच भयंकर बघायला मिळतोय. या उन्हाच्या कडाक्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होतोय. 

👉 परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांचे व्याज माफ : रावसाहेब वर्पे

दरम्यान, आज बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना तत्काळ बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. अचानक तब्बेत खालावल्यामुळे मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

👉 जिल्हयात 37 गावांतील पाणी नमुने दूषित ! 

Post a Comment

Previous Post Next Post