अभिनेत्रीसह तिघींची देह व्यापाराच्या दलदलीतून सुटका; दलालांना बेड्या


। पिंपरी-चिंचवड । दि.26 फेबु्रवारी । पिंपरी चिंचवडमध्ये अभिनेत्रीकडून वेश्या व्यवसाया करुन घेतला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने तिघी जणांची सुटका केली आहे. छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचा आरोप आहे.

या अभिेत्रीसह आणखी दोन महिलांची सुटका करण्यात आली. दोन दलालांना पोलिसांकडून बेड्या ठेाकण्यात आल्या आहेत. ही कावाई ताथवडे येथील एका लॉजवर करण्यात आली आहे.

माहिती अशी की, छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील साई लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारुन कारवाई करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post