जाधव यांच्या घरी दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी

। मुंबई । दि.26  फेब्रुवारी । गेली 24 तास उलटूनही शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे.

आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मारून बसले आहेत. मध्यरात्रीच्या वेळीत यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढल्याचे समजल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र झाले.

शिवसैनिकांनी आयकार विभागाच्या छापेमारीच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्थानिक पोलिसांनी त्यांना शांत केले तरी रात्रभर शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून राहिले.

15  कोटींच्या घोटाळ्याचा आरोपयशवंत जाधव यांच्या माझगावमधील दोन घरांबाबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत.

त्यासोबत यशवंत जाधव यांचे पीए, पालिकेतील कंत्राटदार यांच्या मुंबईतील एकूण 25 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या मालमत्तांबाबत ईडीच्या अधिकार्‍यांचा तपास सुरू आहे.

माझगाव, काळाचौकी, मालाड, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणी या धाडी प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लाँडरिंग आणि 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post