संकट काळात राष्ट्रवादी पक्ष हा जनतेच्या पाठीशी : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापनदिन 

पक्ष कार्यालय येथे झेंडा वंदन करून साजरा

 । अहमदनगर । दि.11 जून । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापन दिनानिमित्त नगर पुणे रोड येथील पक्ष कार्यालय येथे झेंडा वंदन करून साजरा करण्यात आला यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील,आ.संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर आदींसह


शहर युवक जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे,सरचिटणीस शहानवाज खान, सय्यद गालिब अली,अनिकेत राठोड, सुरेश बनसोडे, संध्याताई सोनवणे, साधनाताई बोरुडे, अशोक बाबर, गजानन भांडवलकर, किसनराव लोटके, संजय सपकाळ, सिताराम काकडे, प्रकाश भागानगरे, विजय गवाळे, तुषार टाक, फारूक रंगरेज, किसनलाल बेदमुथा,  आबासाहेब सोनवणे, सबाजी गायकवाड, रुपेश काळेवाघ, बाळासाहेब जगताप, गणेश बोरुडे, अमोल कांडेकर आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत.

 

पुरोगामी विचार व विकासाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे अस्तित्व निर्माण केले संकट काळात जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच उभा राहिला आहे अशी भावना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली तर राष्ट्रवादी पक्षाला 22 वर्ष होत असताना सर्वसामान्यांसाठी प्रभावीपणे पक्ष कार्यरत आहे जगभर कोरणा चे संकट असताना राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाने कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यास यश येत आहे राजकीय कार्यक्रम न घेता झेंडावंदन करून पक्षाचा स्थापना दिन साजरा करण्यात आल.

 

जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की कोरोणाची भीती बाजूला सारून राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे राष्ट्रवादीने सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून समाजकारण केले कोरोना महामारी मध्ये संकट काळात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार हे सर्वसामान्यांना आधार देत आहे जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोणाच्या संकट काळात गरजूंना विविध प्रकारे मदत केली तसेच लाखो नागरिकापर्यंत मदत पोहोचल्याने  त्यांच्यामध्ये एक प्रकारची समाधानाची भावना निर्माण झाली व तो कुटुंब राष्ट्रवादीशी जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post